श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 160 – ओवी – देव गणेशा – ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
आधी वंदू एकदंता…।
तूच असे बुद्धी दाता..।
सकलांचा सुखकर्ता…।
देव गणेशा..।।१।।
चौदा विद्यांचा अधिपती..।
देवगणांचा सेनापती ..।
वंदिते मी अल्पमती
गणनायका..।।२।।
शोभतसे गजवदन..।
तैसेची मूषक वाहन…।
दुंदील तनुचे भूषण …।
धुंम्रवर्णा..।।३।।
कार्तिकेयाचा अनुज…।
तुची असशी गिरिजात्मज….।
गुण वर्णाया बुद्धी मज…।
विद्याधिशा…।।४।।
उटी शोभे शेंदूराची…।
माळ कंठी मुक्ताफळाची…।
बंध त्या फणीवराची…।
पितांबरी।।५।।
बहु मोदकाची आवडी..।
जास्वंदाची फुलझडी।
आणिक दुर्वांची जुडी…।
आवडे भारी…।।६।।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈