सौ.अस्मिता इनामदार
कवितेचा उत्सव
☆ आयुष्याचे मोजमाप… ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆
मी आता सोडून दिलंय
आयुष्याचं मोजमाप घेणं
करायचंय काय घेऊन
कुणाला आहे त्याचं देणं ?
दरवर्षी येतोच ना पावसाळा
तितकाच येतो कडक उन्हाळा
तशाच सोसल्यात मीही
सुखाबरोबर दु:खाच्या झळा..
हसले किती आनंदात
भिजले तशीच संकटात
आधार नव्हता कुणाचाही
तरीही चालले फुफाट्यात..
आता सारी पार केलीत
संसारातली धोक्याची वळणं
म्हणून आता सोडून दिलंय
आयुष्याचं मोजमाप घेणं…
© अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
[…] Source link […]