श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ रंगबेरंगी शब्दाविष्कार… ☆ श्रीशैल चौगुले ☆
रंगबेरंगी शब्दांनी
कवणांची रंगावली
हृदयाच्या या अंगणी
कृष्णनाद केकावली.
चंचल ऋतू चलन
भक्तीप्रीय शब्दांजली
अक्षर जीवन रंग
राधेसाद कृष्णांजली.
पर्णलेखणी मुरली
भावचरणे अधीर
लयताल सुमधूर
ज्ञानदर्शन मंदिर.
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈