श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 161 – माझा पांडुरंग – ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
भक्ती वेडा पुंडलीक
भक्ती त्याची साधा भोळी..।
ऊभा राही चंद्रमौळी …।
विटेवरी…।।१।।
☆
धन्य धन्य सखूबाई ..।
देव बंदी तिच्या घरी..।
संत सखू वारी करी..।
पंढरीची…।।२।।
☆
जनाईचे जाते ओढी.,।
नाम्यासाठी खीर खाई…।
गुरे राखी चोख्या पायी…?
पांडुरंग …।।३।।
☆
बादशाही दरबारी..।
महार झाला जगजेठी..।
हातामधे घेऊन काठी..।
दामासाठी..।।४।।
☆
थोर भक्त अधिकार..।
देव बनला कुंभार।
देई मातीला आकार..।
गोरोबांच्या…।।५।।
☆
भक्तांसाठी ना ना रंग..।
उधळीतो पांडुरंग ..।
रोज कीर्तनात दंग…।
नामाचीया…।।६।।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈