श्री तुकाराम दादा पाटील

संक्षिप्त परिचय

संस्थापक /अध्यक्ष – १)  नव महाराष्ट्र काव्य, साहित्य, कला संस्कृती, परिवार पिंपरी पुणे ४१११७  (रजि.नं.महा.१७२५/२००२) २) निर्मोही प्रकाशन पिंपरी

इतर संस्था  सहभाग  व कार्य – १) विशेष कार्यकारी अधिकारी पिंपरी २) मा.उपाध्यक्ष म.सा.प.साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड   ३) खजिनदार  पुणे शहर ज्येष्ठ ना.संघ शिवाजीनगर पुणे ३०

प्रकाशित साहित्य – 

१)  काव्यसंग्रह –  १)कलिका (१९८७) २) कातरवेळ(१९८८) ३) मनीमानसी (१९९६) ४) कर्मवीर स्तवन (१९९७) ५) आत्मभान (२००३)  ६)सं दर्भ  (२००७)

२) गझल संग्रह – १) निर्मोही (२०००) २) हे गोफ रेशमाचे (२००५)  ३ )रुजुवात (२००७) ४) तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला (२००९)

३) कथा संग्रह –   १) इगत(१९८६) २) माणसातली ओमाणसं (१९९३) ३) मंथरलेलं दान (२००७)  ४) पाऊल वाटा (२००७)  ५) दीड पाय (२००८) ६) संस्कार (२००८) ७) हेडम्या (२००८) ८) वादळवारे (२००९)

४) कादंबरी – १) तुझ्याच साठी (२००५) २) तू आणि मी (२००७) ३) आम्ही असेच(२००८)  ४) कलंदर (२००८)

५) नाटके/एकांकिका –  १) पतिता (१९८५)  २)प्रतिभा मिळे प्रतिमेला(१९८८) ३) आम्ही सारे नटच (२००१) ४) कथा जानकीची (२००७) ५) खेळ डोंबा-याचा(२००६) ६)फुरं झालं आता (२००७) ७) धरती माता(२००९)

बाल आणि प्रौढ साक्षरता साहित्य- १) सुंदर बन (कथा) २) वाडा झपाटलेला (कथा) ३) बाल कविता व गाणी ४)बालकांचे कर्मवीर (चरित्र) ५) छ. संभाजी (चरित्र) ६) संत तुकाराम (चरित्र)

इतर स्फूट लेखन / शिक्षण महर्षी कर्मवीर

शोध निबंध –  मिरज तालुका पूर्वभाग स्थिती आणि गती / वृत्तपत्रीय लेखन * विहीर  बागायत शेती   समस्या व उपाय अहवाल *दंडोबा डोंगर परिसर प्रदेश वर्णन *भिलवडीतील शाहिरी वाडःमय परंपरा *ग्रामीण साहित्यिक म.भा.भोसले * अनेक कविता संग्रहाची परिक्षणे *कथा, कविता, संग्रहाना प्रस्तावना

आकाशवाणी पुणे, सांगली श्रुतिका लेखन/सांगली – रंग उगवतीचे, गोष्टी गावाकडच्या, काव्यवाचन, कथाकथन पुणे / चालू जमाना, शेजारी, आपण सारे, आमची माती आमची माणसं, श्रमिक जगत, अैलतीर पैल तीर, कथा,काव्य, गझल वाचन.

☆ कवितेचा उत्सव : आधार  ☆ श्री तुकाराम दादा पाटील  ☆

आज मनाच्या राना मधली

सकस जाहली ओली माती

रुजू लागली नव्या दमाने

माणूसकीची हिरवी नाती

 

सरत रहावे थोडे थोडे

देणे घेणे सुखदु:खाचे

स्वप्न मनाशी बेतून घ्यावे

नवांकुराना वाढवण्याचे

 

घडत रहावी अशीच किमया

या देहाचे व्हावे चंदन

दाहकतेला शांत करावे

गंध चंदनी मळवट लावून

 

मातीवरती ठेवून श्रद्धा

जगण्या वरती प्रेम करावे

दुस-या साठी झिजता झिजता

मरणाला ही विसरून जावे

 

ज्ञानेशाच्या ओवी मधल्या

सामर्थ्याने समर्थ व्हावे

या जन्माचे करून सार्थक

नाव आपुले अमर करावे

 

संत तुक्याची अभंगवाणी

धमण्यामधुनी वहात जावी

दिंडीमधल्या वारक-यानी

माती वरची गाणी गावी

 

या देहाचा वृक्ष वाढता

फळाफुलानी बहरून जावा

ऊन बावळ्या माळावरती

फिरणाराला आधार व्हावा

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments