श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 163 – बाळ गीत – इंजिन दादा इंजिन दादा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
इंजि न दादा इंजिन दादा
थांब थांब थांब।
सोडू नको धूर असा लांब लांब लांब।।धृ।।
कोळसा खाऊन पाणी पिऊन केली फार मजा।
इजिनाचा धूर झाला आमच्या साठी सजा
निरामय आरोग्याला ठेवू नको लांब
इंजिन दादा ….।।१।।
देऊन रोज कोळसा ती खाण झाली रिती।
इंधन साठा पुरेल का वाटे आम्हां भिती।
करून सवरून बनू नको आता भोळा सांब।
इंजिन दादा ….।।२।।
तेच निशाण तीच शिट्टी वाजू दे रे छान।
आधुनिक इंधने वाढवतील रे शान।
काळासोबत धावूनिया जावू लांब लांब
इंजिन दादा ….।।३।
कर नारे बदल थोडा, युग आले नवे
झुक झुक गाडीतून फिरायला हवे
गेले झेंडे आणि कंदील आले नवे खांब
इंजिन दादा ….।।४।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈