श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “जुने – नवे….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
जुने मरूद्या सांगा आधी तुम्हापाशी काय नवे ?
आम्हा सांगा नव्यामधूनी काय वाटते हवे हवे ?
युगे युगे ते सूर सात, आठवा सापडला का आठवा !
जुन्यास घालून नवे आंगडे होतिल का ते सूर नवे ?
तीच अक्षरे शब्द तेच अन् नवी बाटली दाखवता ?
जीवन आमुचे खर्चून आम्हा सापडले ना काही नवे.
ध्यास नव्याचा खरेच सुंदर, जीवन त्याच्यामधे सरे.
नवे खरोखर सापडले तर सा-यांना ते हवे हवे.
म्हणून म्हणतो ध्यास नव्यांचे पिढ्यापिढ्यांना हवे.
परंतु मागिल संचित पाहुन प्रयत्न व्हावे नवे नवे.
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈