सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “एक पाऊस असा यावा” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
एक पाऊस असा यावा
मनातला कचरा वाहून जावा
झुळझुळ वहावा प्रवाह नवा…
एक पाऊस असा यावा
अहंकार सारा धुऊन जावा
पुन्हा बालपणातील मी आठवावा..
एक पाऊस असा यावा
निघून जावी नात्यातील कटुता
प्रेमाचा अखंड झरा खळखळावा ….
एक पाऊस असा यावा
मोह मायेचा गंध ना उरावा
निर्मळ मनाचा सुगंध पसरावा….
एक पाऊस असा यावा
तुझं माझं लवलेश न रहावा
साऱ्या विश्वाला एकरूप करून जावा ….
एक पाऊस असा यावा
प्रत्येक मनी श्रावणधारा
आयुष्याला हिरवागार पेहरावा….
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈