श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ माणसंच माणसं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
माणसं सगळी हुशार असतात
संधी मिळताच डोक्यावर बसतात
भलाबुरा अनुभव घेऊन
नको तिथं फिदीफिदी हसतात
माणसं सगळीच संत नसताना
काही उपद्रवी काही परोपकारी असतात
माणसं माणसांना जीव लावतात
मन लाऊन वाचली की सगळीच कळतात
कोणी कोणाला जोखत असतात
स्वतःच मोठेपण मिरवून घेतात
हरवत किंवा जिंकत बसतात
वसवत जातात उसवत जातात
नखरे करतात हवं तिथं फिरतात
कधी बावरतात कधी सावरतात
काळाला मात्र सारीच घाबरतात
आलाकी सोडून पसार होतात
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈