सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ वीर जवान 🇮🇳 ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
सळसळते वर्दीच्या आत
ते रक्त वीरतेचे
देशसेवा प्रण घेतलेल्या
त्या वीर जवानाचे
वर्दीत झाकलेली ती
छाती अभिमानी असते
या मायभूचे रक्षण करता
भय मृत्यूचेही नसते
ऊंच फडफडत्या तिरंग्या
आहे बलिदान जवानांचे
प्राणास घालुनी आण
घेतले प्रण विरतेचे
वीर ऐसे जन्मा आले
थोर भाग्य मायभूचे
विरांच्या या भूमी वरती
थरथरती पाय शत्रूचे
जय जवान जय किसान
नुसतेच देतो नारे
निद्रिस्त झालो आम्ही
वीरास कुणी जाणिले
सीमेवर भारतभुच्या
शत्रूचे तुफान येते
रूप मर्द मावळ्यांचेच
ये वीर जवानाते
‘जय जवान जय किसान’ चे
नुसतेच नकोत नारे
होऊनी जागृत आता
वीरांस यां जाणा रे
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈