डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☆ तिरंगा 🇮🇳 ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
उंच फडकतो प्रिय तिरंगा
यशामृताचे क्षण साठवू
नसानसातील देशप्रेमाने
भारतभूमिचे ऋण आठवू
देश माझा मी देशाचा
याचे कायम भान ठेवू
काळजातील स्वातंत्र्याचे
अभिमानाने जतन करु
स्वातंत्र्यास्तव प्राण अर्पिले
अनामवीरांना नमन करु
हुतात्म्यांच्या बलिदानांचे
मनापासूनी स्मरण करु !
अहिंसेचा सूर्य उगवला
सत्याग्रहाचा हात धरु
लोकशाहीच्या मुल्यांनी
सुराज्याचा ध्यास धरु !
समतेची गोधडी घेऊन
देशभक्तीचे बीज उबवू
भारत मातेच्या मानातील
मानवतेचे नवे गीत गाऊ !
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈