सुजित शिवाजी कदम
(सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है! आज प्रस्तुत है उनकी श्री गणेश उत्सव के पर्व पर एक हृदयस्पर्शी कविता “सहवास…!”। आप प्रत्येक शनिवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं। )
☆ सुजित साहित्य – सहवास…! ☆
दर वर्षी मी घरी आणणा-या गणपतीच्या
मुर्तीत मला माझा बाप दिसतो
कारण…!
मी लहान असताना माझा बाप जेव्हा
गणपतीची मुर्ती घेऊन घरी यायचा
तेव्हा त्या दिवशी
गणपती सारखाच तो ही अगदी….
आनंदान भारावलेला असायचा
आणि त्या नंतरचा
दिड दिवस माझा बाप जणू काही
गणपती सोबतच बोलत बसायचा…
माझ्या बापानं केलेल्या कष्टाची आरती
आजही…
माझ्या कानातल्या पडद्यावर
रोज वाजत असते
आणि कापरा सारखी त्याची
आठवण मला आतून आतून जाळत असते
आज माझा बाप जरी माझ्या बरोबर नसला
तरी..,त्याच्या नंतर ही गणपतीची मुर्ती
मी दरवर्षी घरी आणतो
कारण.. तेवढाच काय तो
बाप्पाचा..!
आणि
बापाचा..!
दिड दिवसाचा सहवास मिळतो..!
© सुजित शिवाजी कदम
पुणे, महाराष्ट्र
मो. 7276282626
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अतिसुंदर आणि तरल भावना सुजित!!! खुपच छान!!! GOD Bless!!!!
सुंदर रचना
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
खूप सुंदर भावनांचे दर्शन देणारी कविता.