श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 168 – विज्ञानाची जादूगिरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
विज्ञानाच्या गंमतीची
नवी जादू झाली सुरू।
कापराने प्लास्टिकचे
मासे लागतील फिरू।
पाण्यामध्ये लेझर रेss
उगा बसला रुसून।
दोन थेंब दूध देता
पुन्हा दिसला हसून ।
कार्बनडायआॕक्साईड
असे फार करामती।
पाण्यामध्ये युनो टाका
अन् विझे मेनबत्ती।
प्लेटवर सात रंग
आले ऐटीत सजून।
गरगरा प्लेट फिरे
पांढऱ्यात विरून।
चिमटीत कुंकवाचा
असा झाला कसा बुक्का।
लिंबातून रक्त येता
मज बसे मोठा धक्का ।
समजली विज्ञानाची
आता सारी जादुगिरी।
जादूटोणा भूलथापा
भूत दिवटी ना खरी।
विज्ञानाची कास धरू।
आता आम्ही सारी मुले।
ज्ञान विज्ञान जोडीला
सारे आवकाश खुले।
रंजना लसणे☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈