श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 173 ☆चांदोमामा…! ☆ श्री सुजित कदम ☆
चांदोमामा तुझ्यासाठी
इस्रोने पाठवली आहे भेट..
पृथ्वी वरून तुझ्याकडे
झेपावली आहे थेट…!
कशी वाटली भेट..?
आम्हाला सांग बरं.!
तुझी खुशाली आम्हाला
नक्की कळव बरं..!
चांदोमामा तुला आता
एकटं एकटं वाटणार नाही
तुला सोडून यान आता..
कुठे सुध्दा जाणार नाही..!
इस्रोने पाठवलेल्या यानाशी
आता तू खूप खूप बोल…;
त्याला सांग पृथ्वी सारखाच
मी आहे गोल गोल…!
चांदोमामा चांदोमामा
उंचावली आमची मान
तुझ्या भेटीने भारताची
वाढली आहे शान….!
तुझ्या भेटीकडे लागलं होतं
इथे सा-या जगाचं लक्ष
तुझी भेट पाहताना
सगळे विसरले होते पक्ष
वाटलं कधी तर मामा..
आईला भेटायला नक्की ये
तो पर्यंत तू तुझी
नीट काळजी घे…!
© श्री सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈