श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ चेहरा तोच आहे…! ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
आरसे फुटले कितीही मोहरा तोच आहे
स्पंदने सुटले कितीही चेहरा तोच आहे.
☆
पारणे फिटले कितीही आशयी तोच आहे
लोचने मिटले कितीही चेहरा तोच आहे.
☆
काळजा लुटले कितीही भाबडा तोच आहे
बंधने तुटले कितीही चेहरा तोच आहे.
☆
भावना पुसले कितीही संयमी तोच आहे
आसवे हसले कितीही चेहरा तोच आहे.
☆
प्रेयसी रुसली कितीही साजना तोच आहे
साथही एकटी कितीही चेहरा तोच आहे.
☆
सांगते मन हे कितीही चोरटा तोच आहे
प्रेम जे लपवी कितीही चेहरा तोच आहे.
☆
सावळा फसवे कितीही राधिका तीच आहे
नाटकी दुनिया कितीही चेहरा तोच आहे.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈