सुश्री मंजिरी येडूरकर
कवितेचा उत्सव
☆ मानस पूजा ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
गोड मानूनी घ्यावी वरदा, आज ही मम पूजा
नयनात वसे तव मूर्ती, ना कोणी दूजा
तव स्नानासाठी अश्रुंचे या नीर मी साठविले
पापण्यांनी तुझ्या समोरी, जुडे दुर्वांचे मांडिले
माझे काही नाही जवळी, सारे तुझेच रे दान
सद्विचारांचे गंध लाविते, तव भाळी छान
सद्गुणांचे फूल वाहते, तव जपा घे मानूनी
सत्कर्मांची ओंजळ तुजला, मंत्राक्षता जाणूनी
गोड स्वरांनी कोकिळ गातो, तुझी आरती राजा
लगबगीने घंटा वाजवी, चिमण्यांची ही प्रजा
नमस्कारा हात जोडीते, एक असे मागणे
पूजेच्या या साहित्याला, कधी न पडो रे उणे
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Khup chan.. Apratim