सुश्री शोभना आगाशे
कवितेचा उत्सव
☆ लपंडाव… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
☆
निळ्या अर्णवी शोधित राही,
श्रीकृष्णाची अतल निळाई।
निळ्या अंबरी अनंत निळेपण,
चकवुनि जाता हताश होई॥
☆
मधुवनी घुमता बासुरीचे स्वर,
शोधू जाता निसटुनी जाई।
शारदराती रास खेळता,
अगणित रूपें समोर येई॥
☆
भास कोणता, खरा कोणता,
दृष्टीभ्रम का मलाच होई।
पुरे हरी हा लपंडाव ना,
मज सामोरी झडकरी येई॥
☆
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Apratim👏