कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 29 ☆
☆ नाही मन ते निर्मळ… ☆
मन शुद्ध नसता, देतो आणिका दूषण
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…धृ
पाहतो उणे अनेकांचे, स्वतः आचरतो हा दोष
अंधार असता स्व-घर, दिवा दाखवी दुसऱ्यास
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…१
नाही स्व-घरावर छत, कौल मोजतो दुसऱ्याचे
घरी गळते छप्पर, आणि पाणी पडते चौफेर
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…२
जडला की जणू याला, महा-भयंकर रोग
दुसऱ्याच्या कार्यात, करतो कूट-कारस्थान
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…३
घरातील कचरा, हम रस्त्यावर टाकी
नागरिक देशाचा, नाही त्यास अवधान
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…४
ढोंग विवेक दाखवी, आत काळिमा ती याच्या
भोंदूगिरी करितो नित, मूळ असून सैतान
नाही मन ते निर्मळ, काय करील साबण…५
© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈