श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ तुलाच जमते… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
(वृत्त. अनलज्वाला)
☆
कारण नसता उगाच हसणे तुलाच जमते
हसता हसता गोड डीवचणे तुलाच जमते
मला वाटते वरचेवर मी तुला फसवतो
खोटे खोटे उगाच फसणे तुलाच जमते
तू असताना राज्य मनावर तुझ्या रुपाचे
नसतानाही समोर असणे तुलाच जमते
दूर उभा मी पहात बसतो तुझेच नखरे
खुसपट काढुन झकास रुसणे तुलाच जमते
वेळ ठरवणे भेटीची पण उशिरा येणे
हिरमुसलो तर मला हसवणे तुलाच जमते
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈