सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ चहा की कॉफी?☕… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
☆
चहा तो असतो
कॉफी ती असते
दूध साखरेची जोडी
त्यांचे आई वडील भासते
कोणाला मुलगा पाहिजेच
तर कोणाला मुलगी हवी असते
त्यांच्याविना नात्याला कधी
पूर्तता येत नसते
आई वडील गोरे तरी
मुले सावळी होतात
पण गुणांच्या जोरावर
ती सवाई ठरतात
चहा असो वा कॉफी
भेद नसावा त्यांच्यात
मरगळ घालवून आयुष्याची
जीवनात गोडवा तरतरीच आणतात
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈