सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ एक झोपडे कवितेचे… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
रूजून अक्षरं अक्षरे
शब्द हिरवे व्हावे
गीत शब्दांचे होऊन
हिरव्या कुशीत रूळावे
ओल्या मातीच्या स्पृर्शानी
शब्द गंधाळून जावे
हिरवा आनंद घेऊन
थवे पाखरांचे व्हावे
सरींनी धुंद होऊन
मातीला बिलगावे
चला करूया पेरण
रूजवू शब्दाचे बियाणे
काळ्या मायला देऊ
हे दान शब्दपुष्पांचे
हिरव्या रानात बांधू
एक झोपडे कवितेचे
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈