श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ लोकशाही… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
देवध्यानी सोनचाफा बहरला दारात आहे
आत्मप्रौढीच्या खरा तो गुंतला प्रेमात आहे
☆
शक्तिशाली राबणारे हात दोन्ही भक्त झाले
आदराने देव त्यानी पेरला रानात आहे
☆
न्यायनिष्ठा पाळणारा कायदा लाचार झाला
लोकनेत्यांनीच त्याला डांबला नोटात आहे
☆
देवतांची आरती ही थांबली होती कशाने
जातिभेदाच्या कृपेने रोखली वादात आहे
☆
लाजमोडे लोकसारे लाजही कोळून प्याले
घातपाती द्वेष त्यानी लपवला पोटात आहे
☆
दैत्य झाले आज सारे राजसत्ता मागणारे
दहशतीची आग आता पसरली जोमात आहे
☆
धावणारा देश आहे चालला कोठे कळेना
दीनवाणी लोकशाही कोणत्या शोधात आहे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈