कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 196 – विजय साहित्य ?

☆ भाऊबीज ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

कार्तिकात द्वितीयेला

आली आली भाऊबीज

म्हणे बहिण भावाला

जरा आसवात भीज.. . . ! १

 

भाऊ बहीणीचा सण

औक्षणाचा थाटमाट

आतुरल्या अंतरात

भेटवस्तू पाहे वाट. . . . ! २

 

दोन घास जेवूनीया

आशिर्वादी मिळे ठेव

दीपोत्सव ठरे सार्थ

आठवांचे फुटे पेव. . . . ! ३

 

किती दिले किती नाही

हिशोबाचा नाही सण

ओढ नात्यांची करते

आयुष्याचे समर्पण. . . . ! ४

 

चंद्रा मानुनीया भाऊ

कुणी करी भाऊबीज.

बहिणीच्या सुखासाठी

भाऊ करे तजवीज…!  ५

 

अशी स्नेहमयी वात

घरोघरी  उजळावी.

मांगल्याची भाऊबीज

मनोमनी चेतवावी.. . ! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments