श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 176 – जीवनाचे अंतरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
जीवनाचे अंतरंग
कोण जाणे याचा तळ।
स्थिर ठेवू मन बुद्धी
निवळेल थोडा मळ।
जीवनाच्या अंतरंगी
संयमाचे अधिष्ठान।
प्रेम जल सिंचनाने
दृढ नाते प्रतिष्ठान।
जीवनाला लाभतसे
ऊन सावलीचे दान।
सदा असावे रे मनी
ऋतू बदलाचे भान।
नको धावू मना थांब
तुझी अवखळ खोडी।
ढवळून अंतरंग
चाखतोस काय गोडी।
नाना रंग दाखवीते
अंतरंगी तुझी छबी।
प्रतिबिंब काळजाचे
सांगे स्वभाव लकबी।
चार दिवसाची नाती
चार दिवसाचा संग।
उणे दुणे सोडूनिया
जपुयात अंतरंग।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈