कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 199 – विजय साहित्य
☆ वादळातील दीपस्तंभ तू…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
हे भीमराया गाऊ किती रे
तुझ्या यशाचे गान
जगण्यासाठी दिले आम्हाला
अभिनव संविधान… !
तूच घडवले भीमसैनिका
जगती केले रे बलवान
शिका लढा नी संघटीत व्हा
जपला स्वाभिमान…. !
माणूस होतो माणूस राहू
जातीभेदा नाही स्थान
ज्ञानी होऊ ज्ञान मिळवुनी
घडवू देश महान…. !
शिक्षण घेऊन झाला ज्ञानी
दिलेस आम्हा धम्माचे वरदान
प्रज्ञा, शील आणि करूणा
जीवनज्योत प्रमाण .. !
वादळातील दीपस्तंभ तू
चवदार तळ्याची आण
तुझ्या रूपाने पुन्हा मिळाला
जीवनी हा सन्मान…. !
चंद्र, सूर्य, जोवरी अंबरी
आम्हा तुझा अभिमान
निळ्या नभाचे छत्र आमुचे
तू जगताची शान… !
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈