श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 180 – विद्याधन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆
☆
जगी तरण्या साधन
असे एक विद्याधन।
कण कण जमवू या
अहंकार विसरून ।
सारे सोडून विकार
करू गुरूचा आदर।
सान थोर चराचर।
रूपं गुरूचे हजार ।
चिकाटीने धावे गाडी
आळसाची फोडू कोंडी।
सादा जिभेवर गोडी।
बरी नसे मनी आडी।
घरू ज्ञानीयांचा संग
सारे होऊन निःसंग।
दंग चिंतन मननी
भरू जीवनात रंग ।
ग्रंथ भांडार आपार
लुटू ज्ञानाचे कोठार।
चर्चा संवाद घडता
येई विचारांना धार।
वृद्धी होईल वाटता
अशी ज्ञानाची शिदोरी।
नका लपवू हो विद्या
वृत्ती असे ही अघोरी।
☆
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈