मेहबूब जमादार
कवितेचा उत्सव
☆ सखे… ☆ मेहबूब जमादार ☆
☆
माझं जगणं सखे तुझ्यात आहे
पुनव चांदणं सखे तुझ्यात आहे
☆
धुंडाळले जग ते क्षीतिज पल्याड
माझे क्षीतिज सखे तुझ्यात आहे
☆
स्वप्नांचा फुलोरा असा बहरत जावा
फुलांचे बहरने सखे तुझ्यात आहे
☆
मी कुठे उरतो सखे तुझ्याविना
जे माझे आहे सखे तुझ्यात आहे
☆
रात्रंदिन असतो मला तुझाच ध्यास
माझा सारा प्रवास सखे तुझ्यात आहे
☆
© मेहबूब जमादार
मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली
मो .9970900243
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈