कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 202 – विजय साहित्य
☆ अलौकिक ठेवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
☆
दत्त नाम जप
अवधुत छाया
निरंकारी माया
चिरंतन…१
दत्त उपासना
गुरू कृपा योग
दुःख दैन्य भोग
दुर करी…! २
दत्त दिगंबर
त्रिगुणांचा स्वामी
पाहू अंतर्यामी
तिन्ही देव…! ३
ब्रम्हा,विष्णू ,शिव
सगुण साकार
संकटी आधार
दत्तनामी…! ४
कामधेनू ,वेद
डमरू त्रिशूल
अहंकारी धूल
नष्ट करी…! ५
भूत प्रेत बाधा
नष्ट करी नाम
अंतरीचे धाम
दत्तात्रय…! ६
गुरू चरीत्राचा
अलौकिक ठेवा
घडे नित्य सेवा
पारायणी…! ७
कविराज चित्ती
अभंगाचा संग
भक्तीभाव रंग
सेवाव्रती…! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈