सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ तूच… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
फुलणारे फूल ,
कधीतरी सुकणार !
हे माहीत असूनही,
फुलाचा सुगंध घ्यायला,
तूच शिकवलेस मला !…..१
समईची जळणारी ज्योत,
तेल, वात संपल्यावर
विझून जाणार !
पण समई सारखे मंद तेवायला,
तूच शिकवलेस मला!…..२
येणारा प्रत्येक क्षण
पुन्हा येणार नाही,
हे माहीत असूनही,
प्रत्येक क्षण आनंदाने जगायला,
तूच शिकवलेस मला!…..३
आयुष्याचे दान मला दिल्यावर,
ते इतरांना कसे वाटावे,
दुसऱ्यासाठी कसे झिजावे,
तूच शिकवलेस मला !…..४
हा प्रत्येक क्षण कारणी लागावा,
म्हणून झुरतंय मन ,
त्याला मार्ग दाखव ,
हेच विनविते तुला..!…..५
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈