सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ नव वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
कॅलेंडर बदलतं नि वर्ष नवं येतं
सांगा बरं काय घडतं ?
बदलतात का सूर्य-चंद्र ?
नाही हो !सृष्टी नाही बदलत.
एक मात्र नक्कीच घडतं
बदलतं आपलं मन.
नवी आशा,नवोन्मेष,संकल्पांचंं दालन
भविष्याचा वेध घेण्या,एक नवं कारण
जीवनाला उभारी देतं,स्वागतोत्सुक मन
चित्तवृत्ती बदलण्याचं,ठरतं एक साधन.
कौटुंबिक जिव्हाळा ते वृद्धिंगत करतं
नववर्ष मनामनांना, नव्यानं सांधतं .
© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी
हैदराबाद.
भ्र.९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈