सुश्री निलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ पदार्पण नववर्षात… ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
नववर्षात पदार्पण करता
मागे सोडू नकारात्मकता
हेवा ,मत्सर ,द्वेशही सोडू
पाठीमागे पुढती जाता
खुप काहीसे आनंदी क्षण
काळीजकुपी जपून नेऊ
लळा जिव्हाळा आपुलकी
रेशमलडीसम संगती घेऊ
घडले काही आनंददायक
शिदोरीसम बांधून घेऊ
यातनादायक सारे सारे
इथेच पुरते गाढून जाऊ
हातामध्ये हात घेऊ या
आपुलकीचा संदेश देऊ या
संकट समयी मी आहे ना!
एकमेकांना विश्वास लेऊ या
© सुश्री निलांबरी शिर्के
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈