डॉ.सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
☘️ नवीन वर्षात ❔❔ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
स्वतःला नव्याने
शोधता येईल ?
शोधले तरी
जगता येईल ?
निवडूंगाचे
गुलाब होईल ?
शब्दांशिवाय
बोलणे कळेल ?
डोळ्यातल्या भावना
वाचल्या जातील ?
भावनेचा मनापासून
आदर होईल ?
स्वयंपाक घर
विरुन जाईल ?
नास्ता जेवण
सहज मिळेल ?
न आवडणाऱ्या गोष्टी
टाळता येतील ?
हवे तेवढे
वाचता येईल ?
हवी त्याला हाक
देता येईल ?
विनाअट कुणी
नाते ठेवेल ?
आई सासखं कुणी
अलिंगन देईल ?
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈