कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 205 – विजय साहित्य
☆ शब्द तुझे का स्वरात माझ्या… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(गागा गागा लगाल गागा)
☆
चिंतेचे घर मनात माझ्या
घरघर त्याची उरात माझ्या .
बोलत जातो तुझ्या स्मृतींशी
हळवे वारे घरात माझ्या.
मोठे झाले कधी लेकरू
घुटमळतो मी पदात माझ्या .
बांधावरती ओली बाभळ
सळसळ बोली सुरात माझ्या.
हाती माझ्या प्रगती पुस्तक
रेघ लाल का सुखात माझ्या.
निरोप नाही नसे खुशाली
शब्द तुझे का स्वरात माझ्या.
लेखणीस या फुटला पाझर
हरवशील तू जगात माझ्या .
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈