सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ नांदो रामराज्य… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
तन गुंतले संसारी
मन अयोध्यानगरी
आधी स्पर्शली प्रेमाने
देवालयाची पायरी
*
स्पर्श पायरीला होता
मनी भक्तीभाव दाटे
मन गाभारी जाऊनी
रामरायालागी भेटे
*
मना भेटे रामराया
गेले सीतामायी पाशी
भक्तिभावाने ठेविली
ठोई तिच्या चरणाशी
*
रामराम सिताराम जपी
मन रंगुनीया जाई
नांदो रामराज्य यापुढे
बाकी मागणे न काही
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈