श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 221 ?

☆ आले राघव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आयोध्येला पुन्हा एकदा आले राघव

अजब दिवाळी मंदिरातील घंटा वाजव

*

चूक जाहली लेखी देती करती क्षालन

मुस्लिम बांधव या गोष्टीचे करोत पालन

बाबर वंशज क्षमा मागुनी झाले मानव

*

वचनासाठी चौदा वर्षे भोगलीस तू

राजा असुनी सत्ता होती त्यागलीस तू

सत्तेसाठी धर्म त्यागती त्यांना जागव

*

हिंदू झाले तुझेच रामा वैरी काही

धर्माबद्दल त्यांचे काही वाचन नाही

कलियुगातील हेच खरेतर असती दानव

*

देशोदेशी आज चालला तुझाच जागर

जिथे पाहतो तेथे आहे तुझाच वावर

धर्म सोडुनी दूर चालले त्यांना थांबव

*

शंका नाही रामराज्य हे येइल आता

या विश्वाचा दुसरा नाही कोणी दाता

भटक्यांनाही सद्मार्गाचा रस्ता दाखव

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments