सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ खात्री असू दे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
‘मंदिर त्याचे अयोध्येमध्ये
माझे का नाही ?’…
रुसून बसला बाळकृष्ण
अन् बोलेना काही…
*
‘द्वारकेआधी जन्मलास ना
अयोध्येत तू रामरूपाने
का मग रूसतो सांग कन्हैया
उगीच आता हट्टाने !…
*
सोड हट्ट हा आणिक रुसवा
लवकर जा रे गोधन घेऊनी
गोपाल तुझी बघ वाट पहाती
हुंदडायला वनरानी…
*
रुसू नको रे पूर्ण होऊ दे
अवधनगरी ती सर्वांगानी
मथुरेतही मग होईल सारे
खात्री असू दे तुझ्या मनी ‘ —
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈