सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ नदी सागरास मिळे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
नदी सागरास मिळे, ही असे जगी रीत ll
पुसे काय कोणी तिला, तुझे काय मनोगत ll….1
*
नदी सागरास मिळे, असे तिला आतुरता ll
दर्याला मिळू जाई, ती आहे समर्पिता ll…..2
*
नदी सागरास मिळे, समुद्री खारे पाणीll
सामावते सागरी, तिची गोडी त्या क्षणी ll….3
*
नदी सागरास मिळे, हेच तिचे कन्यादान ll
पर्वताच्या नशिबी ये, वियोगाचा तोच क्षण ll…..4
*
नदी सागरास मिळे, होई सागर संगम ll
मीलन त्यांचे होई, दुग्धशर्करेच्या सम ll…..5
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈