महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 160
☆ हे शब्द अंतरीचे… अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
☆
अखंड करावे, श्रीकृष्ण भजन
कदापि खंडण, नच व्हावे.!!
*
मनी ध्यास व्हावा, अप्राप्ती भावावी
आवडी धरावी, श्रीकृष्णाची.!!
*
सर्व तोचि देई, सर्व तोचि नेई
नाही नवलाई, या वेगळी.!!
*
कवी राज म्हणे, भावाचा भुकेला
हाकेला धावला, द्रौपदीच्या.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈