श्री शुभम अनंत पत्की
☆ कवितेचा उत्सव ☆ आपणच व्हावे कालनिर्णय ☆ श्री शुभम अनंत पत्की ☆
गरज वाटेना आता काहीच
विचार विद्रोही ठेवण्याची,
उद्विग्न होणे मान्य नाहीच,
वाट पाहतो वर्ष संपण्याची
नवीन आशा असेल मनी,
नाही नुसती दिनदर्शिका
थोडी भीती राहिल जनी,
वर्तुळच भेदू नये स्पर्शिका
नको जरी उसनं अवसान,
थोडं तरी धाडस हवं
होईल आपलंच नुकसान,
जेव्हा संकट दिसेल नवं
पुन्हा उद्दिष्ट स्मरावे आपण,
घ्यावे सर्व महत्वाचे निर्णय
पुन्हा ध्येय करावे स्थापन,
आपणच व्हावे कालनिर्णय…
© श्री शुभम अनंत पत्की
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈