श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 😞 मो क्ष ! 😞 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
कसर लागे ग्रंथास आठवणींच्या
सारे विसरण्याची,
वेळ आली साऱ्या ग्रंथांना
जलसमाधी देण्याची !
*
धीर करुनी बुडवता झालो
त्यांना अथांग भवसागरी,
जाऊन पहाता दुसऱ्या दिवशी
सारे तरंगती पाण्यावरी !
*
जरी नव्हती ती अमोल गाथा
तुकयाच्या अभंगापरी,
चाले जीवापाड धडपड त्यांची
लागण्या लगेच पैलतीरी !
*
कळे दोघांना, सुटका नाही
दोघे जीवंत असेपर्यंत,
चितेवरच मिळेल मोक्ष
उमजे दोघांना तो पर्यंत!
उमजे दोघांना तो पर्यंत!
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈