सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

मराठी साजूक तुपातली… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(शनिवार दि १७ रोजी श्री.विश्वास  देशपांडे यांच्या लेखावर (बाळा मला समजून घेशील ना?) प्रतिक्रियात्मक काव्य)

मराठी ईंग्लीश प्रेमानं समदा समाज झालाय बाद ;

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥

*

अाई बाप म्हणजे मदर फादर

वाटत न्हाई जराबी कदर

करत न्हाई म्हणती आदर

गळ्यातली वाटतीया ब्याद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ १॥

*

ढवळ्या शेजारी पवळा बांधला

वाण न्हाई पण गुण लागला

ईंग्लीशचा पगडा येवढा पडला

पिझ्झा बर्गरलाच स्वाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ २ ॥

*

ईंग्लीश वरती न्हाई पकड

मराठी सुद्धा  बोलेना धड

वाक्यात अनेक ईंग्लीश शब्द

घालू किती मी वाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ३॥

*

टिळक आगरकर रानडे गोखले

मराठीतच शाळा शिकले

ईंग्लीश ज्ञान जरी संपादले

मराठीचीच ऐकली साद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ४॥

*

शेव शेव म्हणता करतोया दाढी

सर सर म्हणता होतोया गडी

रोज रोज म्हणता गुलाब हाती

मागू कुणाला दाद

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ५ ॥ 

*

देणा-याने देत जावे

घेणा-याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणा-याचे हात घ्यावे

ईंग्लीश देते मराठी घेते

ईंग्लीशचाच होणार का माद (Mad)

मराठी साजूक तुपातली ,हिला ईंग्लीशचा लागलाय नाद ॥ ६ ॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments