कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 210 – विजय साहित्य
☆ मौलिक आधार… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
(अष्टांक्षरी रचना…)
☆
एक धागा सुखाचा रे
पदोपदी गुंफलेला
आठवांच्या मागावर
ताना बाना सांधलेला,..! १
*
बाल तारूण्य वार्धक्य
एक धागा जरतारी
वस्त्र तीन रंगातले
आत्मरंगी कलाकारी…! २
*
आठवांचे मोरपीस
बंध हळव्या शब्दांचे
भावनांचे कलाबूत
हार काळीज फुलांचे…! ३
*
सुख नाही रे जिन्नस
त्याचा नसावा व्यापार
काळजाच्या वेदनेला
सुख मौलिक आधार…! ४
*
एक धागा सुखमय
ठेवी नात्यांना बांधून
स्वभावाचे दोष सारे
घेती आयुष्य सांधून…! ५
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈