सुश्री नीलम माणगावे
संक्षिप्त परिचय: कथा, कविता,कादंबरी, लोकसाहित्य,सामाजिक,वैचारिक लेख,संपादकीय,समीक्षणात्मक,संपादन – संशोधन,आत्मकथन,माहितीपर,बालसाहित्य, कुमार साहित्य वगैरे माध्यमातून विपुल लेखन। एकूण 61 पुस्तके प्रकाशित
सदर लेखन – केसरी, लोकमत, जनस्वास्थ्य, श्राविका,रानपाखरं, रोहिणी, ऋग्वेद वगैरेमधून सहा महिने सदर लेखन
सहसंपादक – प्रगती आणि जिनविजय,तीर्थंकर सल्लागार – मासिक इंद्रधनुष्य
अनेक साहित्य संमेलनांमधून कथाकथन, कवितावाचन,संमेलन अध्यक्ष म्हणूनही अनेक वेळा सहभाग
आकाशवाणी सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद कथा, कविता वाचन. कौटुंबिक श्रुतिका लेखन
पुरस्कार
राज्य पुरस्कार – डॉलीची धमाल, शांती: तू जिंकलीस, निर्भया लढते आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक – बाबुराव बागूल पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे – कुसुमाग्रज पुरस्कार, याशिवाय इतर महत्वाचे 42 पुरस्कार
विशेष समावेश-
कर्नाटक राज्य दहावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘सत्कार ‘कथेचा समावेश, महाराष्ट्र राज्य बारावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘स्पर्श’, कथेचा समावेश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद बीए भाग एक ‘प्रसाद’ कथेचा समावेश, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता पाचवी लोअर मराठी ‘कोणापासून काय घ्यावे’ समावेश, मुंबई विद्यापीठ भाग-2 ‘जसं घडलं तसं’या आत्मकथनाचा अभ्यासक्रमात समावेश, महाराष्ट्र राज्य अकरावी पाठ्यपुस्तकांमध्ये ‘पैंजण ‘कवितेचा समावेश, कविता आणि कादंबरीवर दोन प्राध्यापकांनी एम फिल केले आहे.
‘जसं घडलं तसं’ या आत्मकथनाचा कानडी अनुवाद प्रकाशित
☆ कवितेचा उत्सव : उठ उठ पांडुरंगा – सुश्री नीलम माणगावे☆
तुझ्या चिपळ्यांचा नाद
इथं फुंकणीची साद
तिथं भक्तीचा सोहळा
इथं उपाशी प्रल्हाद
तुझ्या पोथी पुराणात
समतेची वाहे गंगा
इथं चौकाचौकात
रोज रडतो तिरंगा
ऊठ ऊठ पांडुरंगा
वीट सोडून ये आता
इंद्रायणीच्या डोहातून
चल उचलुया गाथा
उभा आडवा डोह
घालूया पालथा
आता तरी उचलून
टाकू या ना सत्ता
आता तरी कुणब्यांना
मिळूदे भाकर
नाहीतर निवदाची
कडू होईल साखर
© सुश्री नीलम माणगावे
जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर
सुस्वागतम् आणि धन्यवाद.
तुमच्या कवितेविषयी मी काय लिहावे?
सामाजिक भान असणार्या तुमच्या कविता नेहमीच मनाला विचार करायला लागणार्या असतात.सर्वांचीच साखर गोड राहू दे,ही ईच्छा.
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
सुंदर रचना