कवी राज शास्त्री
(कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं। मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं। विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है। ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ प्रेम काय असतं……”)
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 12 ☆
☆ प्रेम काय असतं…… ☆
प्रेम एक, अडीच अक्षरांचे पत्र
प्रेम एक, मंत्रमुग्ध करणारे स्तोत्र
प्रेम म्हणजे, सहजआकर्षण,
प्रेम म्हणजे, निर्भेळ समर्पण
प्रेम एक निर्मळ सरिता
प्रेम एक मुक्त कविता
नकोत प्रेमात वासना
असाव्या फक्त संवेदना
नुसते शरीराचे, आकर्षण नसावे
प्रेमानेच प्रेमाला, हस्तगत करावे
विचार करावा फक्त मनाचा
मनात राहून मन जिंकण्याचा
नको नुसते हवेत गुब्बारे
प्रेमासाठी मन शुद्ध हवे रे
गंध असले की फुले हातात असतात
गंध संपला फुले कचऱ्यात पडतात
प्रेमाचे सूत्र असे मुळीच नसते
असे असेल तर, प्रेम लगेच संपते
वासनांध प्रेमाला, हवस म्हणतात
त्याला अपवाद काही व्यतिच होतात
म्हणून सांगतो, प्रेम अपराध नसतो
निर्मळ प्रेम, मनाचे मन जोपासतो
मात्र प्रेमात पडून वेळ निभावणं
आणि गरज झाली की साथ सोडणं
हा मात्र अक्षम्य भयंकर गुन्हा ठरतो
एखाद्याच्या मृत्यूस पण त्यात होतो.
कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन,
वर्धा रोड नागपूर,(440005)
मोबाईल ~9405403117, ~8390345500