स्व. मंगेश केशव पाडगांवकर
जन्म – 10 मार्च 1929
मृत्यु – 30 डिसेंबर 2015
‘सलाम’ या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता…
☆ कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
मी उद्या असणार नाही
असेल कोणी दुसरे
मित्रहो सदैव राहोत
चेहरे तुमचे हासरे
झाले असेल चांगले
किंवा वाईटही काही
मी माझे काम केले
नेहमीच असतो राईट मी
माना अथवा नका मानू
तुमची माझी नाळ आहे
चांगले होवो अथवा वाईट
मी फक्त ” काळ ” आहे
उपकारही नका मानू
आणि दोषही देऊ नका
निरोप माझा घेताना
गेट पर्यन्त ही येऊ नका
उगवत्याला ” नमस्कार “
हीच रीत येथली
विसरु नका ‘ एक वर्ष ‘
साथ होती आपली
धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला
शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही
मी माझे काम केले
बाकी दुसरे काही नाही
निघताना ” पुन्हा भेटू “
असे मी म्हणणार नाही
” वचन ” हे कसे देऊ
जे मी पाळणार नाही
मी कोण ? सांगतो
” शुभ आशीष ” देऊ द्या
” सरणारे वर्ष ” मी
आता मला जाऊ द्या।
चित्र सौजन्य – मंगेश पाडगांवकर – विकिपीडिया (wikipedia.org)
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈