सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ कानगोष्टी… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
स्त्री-पुरूष मैत्रीच्या,
सीमा असतात फार धूसर,
निर्मळ नात्यालाही घायाळ करते,
समाजाची गढूळ नजर !
*
हुंगत राहते ती श्वानासम,
सदा, लैंगिकतेचा पदर,
कानगोष्टी होतात खबर,
संशयाचं गारूड मनावर!
*
वाग्बाणांनी करती बेजार,
पुराव्यांची ना इथे जरूर,
मांडूनी आयुष्याचा बाजार,
करती विश्वासा हद्दपार!
*
समाज म्हणजे का कोणी गैर ?
मी, तुम्ही आणि आपणचं सार !
बाजार गप्पांनाच येतो पूर,
आणि सत्य राहतं कोसो दूर !
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈