स्व विंदा करंदीकर
स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’
जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०
☆ कवितेचा उत्सव ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे
मी चालतो अखंड चालायचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकुल सर्व तारे
मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे
चुकली दिशा तरीही आकाश एकआहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे
आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?
कवी – स्व विंदा करंदीकर
(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)
प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈