महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 164
☆ अभंग… कृष्णप्रभू.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/
☆
जगाचा चालक, जगाचा मालक
जगाचा पालक, कृष्णप्रभू.!!
*
कर्म करण्याचा, सल्ला दिला ज्याने
विधी प्रामुख्याने, एकभक्ती.!!
*
त्याचे मी होवावे, त्यातची रमावे
तयाचे ऐकावे, लीलास्तोत्र.!!
*
कवी राज म्हणे, अंधार निघावा
मजला दिसावा, माझा कृष्ण.!!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈