सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ रंग सृजनाचा…. सण होळीचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
☆
तप्त ऊन झळा दाह करिती सृष्टीचा ! शिडकावा देई हळूच थेंब वळीवाचा !
फाल्गुन येईल सण घेऊन होळीचा ! रंग सृजनाचा अन् असीम आनंदाचा !
*
विविध रंगांची रंगपंचमी दिसे निसर्गात!
चाहुल त्यांची मनास देई गारवा वसंतात!
*
जळून जाईल दृष्ट वाईट प्रवृत्ती होळीत!
अन् राखेतून नवनिर्मिती होई जगतात!
*
वसंत चाहूल देई उत्साह जीवनाला! पालवीतील सृजन दिसे नित्य क्षणाला !
फाल्गुन पुनवेचे चंद्रबिंब येता नभी! तेजाने न्हाऊन निघते धरती अवघी!
प्रकटतो सृष्टीचा नूतन अनुपम भाव, रंग सृजनाचा घेऊन येई होलिकोत्सव !
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈