श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ खरे रंग… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
आता रंगत नाही आभाळ
आणि आभाळातल्या इंद्रधनुष्यासरखे मनही,
तरिही रंगपंचमी खेळावीशीच
वाटते,पाखरे सातरंगांच्या सावलीतून उडताना पाहिले कि,
पाण्यातही मिसळत नसतो
नकली रंग विष मिसळलेल्या
रसायनी पावडरचा अगदी
खोटा मायेचा हात फिरवून
स्वतःचा आनंद द्वीगुणीत करणार्या नव्या पिढीसारखा
मग मी न्याहाळातच रहातो
जळणार्या होळीतून येणारा
दारु बिअरची दुर्गंधी सहन करत
रंगपंचमीत भिजलेल्या लाल रंगांच्या अनेक भिन्न आंदोलकांच्या गर्दित हरवलेले माणूसकिचे रंग,
शोधत रहातो हरवलेला कॕनव्हास
ज्यावर ब्रश फिरवून रंगवू ईच्छितो
जुनी रंगपंचमी
परंतु ओघळतच असतो फक्त
लाल रंग न थांबणारा
जिथे नसतात कोणतेच नैसर्गिक
प्रेमाने भरलेले रंग.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈